[ पडदा उघडताना अंधार. हिटलरच्या बर्लिन मधील एकाद्या भाषणाचा आवाज येतो.
लोकांच्या टाळ्या. अंधारात एक मोठी पडछाया हातवारे करत आहे.
तिच्या मालकावर हळुहळू उजेड. एडोल्फ हिटलर चान्सलर होण्यापूर्वी देत असलेले एक भाषण.]
हिटलर :
...आमचं असं ठाम मत झालेलं आहे की राष्ट्रसंघ निर्मितीपुर्वीचा काळ हा जर्मनीसाठी जास्त सन्मानाचा आणि जास्त माणुसकीचा होता...
आम्ही विचारलं युद्ध आवश्यकच आहे का ? तर हे ज्यू शांतीचे दूत म्हणाले, नाही!
देशां-देशां मधला वाद, एकाचे हक्क दुसरा हिसकावून घेतो तेव्हा निर्माण होतो... असे वाद राष्ट्रसंघ शांततेच्या मार्गाने सोडवेल!
हा ! मला असा एक देश बघायचाय जो अन्याय झाल्यावर या संघाकडे येईल
आणि राष्ट्रसंघातल्या ताकदवान देशांविरूद्ध न्याय मिळवून दाखवेल.
आमच्यावर महायुद्धाला सुरुवात केल्याचा आरोप आहे.
व्हर्सोयच्या तहात आमची लांछनास्पद मानहानि केली गेली ! कलम चौदा हे ते मानहानीकारक कलम !
आम्हाला हत्यारे बनवायला बंदी, सैन्य उभारायला बंदी, जहाजं बनवायला बंदी आणि व्यापारालाही बंदी !?
कलम २३१- महायुद्धाला जबाबदार जर्मनीच असून या गुन्ह्याबद्धल तिने २२६ दशलक्ष राईशमार्कस इतकी भरपाई करावी!
जर्मन आर्यांनो, हा तह नाही... जर्मनीचं कफन आहे ! मान्य नाही आम्हाला व्हर्सायचा तह !
कोणी केला हा तह !? सप्टेंबरचे गुन्हेगार ते हेच, ज्यू ! मी म्हणतो, जर्मनी युद्धात, रणावर हरलीच नाही...
तर घरच्या भेदी ज्यूंमुळे हरली ! मला सांगा, अमेरिकेला जर्मनी विरुद्ध युद्धात कोणी पाडलं ?
.. युरोपच्या महायुद्धात, अमेरिकन ज्यूंच्या कारखान्यांनी शस्त्रं पुरवली... महाप्रचंड धंदा केला... शस्त्रांची जागतिक शेती !
पण एव्हढ्याने या लालची ज्यूंची तहान भागली नाही..
म्हणून मग, ज्यू सटोडियांच्या तालावर चालणार्या हर्स्ट प्रेसने जर्मनी विरुद्ध गरळ ओकायला सुरुवात केली.
जागतिक अशांती आणि युद्धांमध्ये या ज्यूंचा नेहमी मोठ्ठा फायदा होतो... आणि म्हणून हे युद्ध लढवतात.
मध्यआशियातून आलेला एक साधा ज्यू व्यापारी युरोपमध्ये पंतप्रधान व्हायची स्वप्नं पाहायला लागला...
का ? ... कसा ?... युद्धातील नफेखोरीमुळे आलेल्या प्रचंड पैशांतून, हा माज यांना आला !
या ज्यूंचा छुपा हेतू आहे, जगाची सत्ता काबिज करणे!
जागतिक युद्धं आणि क्रांती ही संधी त्यांना मिळवून देताहेत. ह्या संधी मिळाव्यात म्हणून आमच्यावर युद्ध लादली जाताहेत !
हे म्हणाले क्रांति करा ! केली ! युरोपीय राजसत्तांचा पाडाव क्रांतीनेच केला गेला आणि यातही या ज्यूंनी अमाप फायदा उकळला !
संख्येने हे आमच्या एक टक्का ही नाहीत, पण व्यवसाय, शिक्षण, कला, संस्कृति
यामध्ये प्रचंड आक्रमण करून यांनी एकाधिकारशाही निर्माण केली आहे...
म्हणूनच आपला लढा फक्त आर्थिक नाही, तर सामाजिक आहे.. सांस्कृतिक आहे !
... आता बस्स ! सार्या जगाला आता कळलं आहे की ज्यू हा युरोपलाच नाही तर सार्या जगाला जडलेला गुप्तरोग आहे.
महा ज्यूंचा प्रश्न सोडवल्याशिवाय युरोपला शांतता लाभणार नाही !
माझ्या आयुष्याने मला अनेकदा भविष्यवेत्ता केलं ! आज मी पुन्हा एकदा भविष्यवेत्ता होऊन सांगतो...
जागतिक व्यापारातल्या अमाप संपत्तीच्या जोरावर, ज्यूंनी युरोपला पुन्हा एकदा महायुद्धाच्या आगीत लोटलंच तर...
त्या महायुद्धाच्या झळा फक्त युरोपलाच बसणार नाहीत ! ज्यूंना ही भोगाव्या लागतील...
या युद्धाचे परिणाम बोल्शेविक क्रांतिमध्ये होणार नाहीत तर संपूर्ण युरोपमधून ज्यूंच्या नाहीसे होण्यामध्ये होतील...
[ प्रचंड टाळ्या. हिटलर आपला हात नेहमी प्रमाणे पुढे करतो. हेल हिटलर ! चे जयघोष दुमदुमतानाच अंधार.]
No comments:
Post a Comment