Thursday, November 12, 2015

१२. गोष्टी सांगणारा माणूस...


बोचक्या नाक्यावर बुलेट स्टॅण्डला लावून सीटवर बसून सांचा नज़ारा ताडत होता. कोई ख़ासा इंट्रेस्ट नथी, जस्ट फॉर टायमपास.
सहा वीस झाले होते, अजुन कालीकांडी गुजरली नव्हती. नाके का भी अपना टायमटेबल होता है।
छे बीस कालीकांडी, साढ़े छ: करंजी, पौने सात -पैतीस, असा हिसाब-किताब होता.
रस नथी ने सरस नथी, जस्ट टैमपास. पाच फुटावर लाट्या सिग्रेटला गिर्हाक शोधत होता,
महाराजकडे बनियाने कुणालातरी कटिंगला कापला होता. धंदेका टायम, गँग तितर-पितर होती.

सामनेसे बकल-बेल्ट आ...ला. हा धंद्याची खराबी करणार! बोचक्याचा वैताग.
भांचो करणार काय नाय, सुकी राख देणार, गाडी साइडला असली, तरी इथून तिथे करायला लावणार, फालतू शो ऑफ.
धंद्याच्या टायमाला बकल-बेल्टना उत् येतो. आपण युनिफॉर्म घातला ही दुनियेवर म्हेरबानगी केली, अशी स्टाइल मारतील.
दोन मिनिट ड्युटीचे नखरे केले की, गाड्यांवर फुकटफकिरी! वैताग!
कल्टी व्हावे, बोचक्याला वाटले. पण आजचा बकल, एरिया में नया पंछी मालूम पड रहा था.
बीट बदलून आला असेल. बोचक्याला फुकट फौजदारी नको होती. सीट फिरवुन त्याने गाडी किक केली.
बुगुर्रर थाड़ थाड् थाड़! बुलेटका घराना शाही सूर में आलापा. तभी बकल-बेल्ट सामने आला.

"ओ! जरा थांबा! मी बीटवर आजच आलोय, थोड़ी आयडिया द्या. नाव काय तुमचं-"
"तानाजी नाग्या बापट" बोचक्याने वर्ण संकर केला.
"दिसत नाय तुमी" बकल.
"कुणासारखे? तानाजी की बापट दिसत नाय?
" नाग्या सारके."
" आता काय करू?
" माझ्यासंग पोलिटेशनला चला, तुमच्या घोरपडीवरून! नाग्याला आत घेतलाय, नस्ल बिगडवली म्हणून."

बोचक्या बुलेटकडे पहातच राहिला...

No comments:

Post a Comment