उंडणा देशात सगळेच उंडरग्राउंड.
जमिनीत बिळे खोदून त्यात राहत.
उण्डनीयंस अतिशय भेकड जमात.
बाहेर खुट्ट झालं तरी सर्रकन बीळ गाठणार.
मग बिळाच्या की होलमधुन टुकुटुकु बाहेर डोकावत, चू-चू असा जोशपूर्ण आवाज करणार.
युद्धाची ललकारी झाली की, किती उंडनियंस कुठल्या बिळात लपलेत, समजत नसे.
मग उंडनियन राजाला, जमेल त्या फौजेनिशी रणदुंदुभी करत,
बिळात हत्तींचे मोठे सैन्य असून ते बाहेर येत आहे, अशी आवई उठवावी लागे.
तिला बिळातनच चू चू करून उंडनियंस दुजोरा देत.
अशा अफवांनंतर शत्रुने माघार घेतली की उंडनियंस आपल्या ताकतीवर गर्व होऊन विजयोत्सव साजरा करीत.
यात प्रत्यक्ष युद्ध करणारे काही उंडनियंस मारले जात,
पण ते अन्य जमातीचे असल्याने कुणाला फारसे दु:ख होत नसे.
आपले राज्य कधीही पराभूत होईल याची उण्डना राजाला खात्री होती.
बिळातील भगोड़े मात्र, परम्परेने जिंकत आलेल्या युद्धांच्या काल्पनिक बखरी रचत, दुबळया छातीत हवा भरीत.
असा उंडना ख्यातकीर्त झाला.
आपण जगावर सत्ता गाजवु शकतो, याची उंडनियंसची पक्की खात्री होती.
अवकाश होता फ़क्त एका पराक्रमी राजाचा.
शतके गेली पण असा राजा उंडना देशी जन्मेच ना....
.... मग त्यांनी एका तगड़या, भीतिदायक माणसाला वाघाच्या कातड्याची वस्त्रे चढ़वली.
जगावर राज्य करण्यास उंडनियंस सज्ज झाले.
........ मात्र राजा अजुनही बिळातच होता.
आपण जगावर सत्ता गाजवु शकतो, याची उंडनियंसची पक्की खात्री होती.
अवकाश होता फ़क्त एका पराक्रमी राजाचा.
शतके गेली पण असा राजा उंडना देशी जन्मेच ना....
.... मग त्यांनी एका तगड़या, भीतिदायक माणसाला वाघाच्या कातड्याची वस्त्रे चढ़वली.
जगावर राज्य करण्यास उंडनियंस सज्ज झाले.
........ मात्र राजा अजुनही बिळातच होता.
No comments:
Post a Comment