Monday, November 9, 2015

१०. गोष्टी सांगणारा माणूस....


विचार करून करून 34 नं. बीडीडी चाळीतला वशा खपाटे टेक़ीला आला होता.
इतका विचार त्याने कधीच केला नव्हता.
आजवर तो फ़क्त पोटाने विचार करायचा.
त्या शिवाय कोणता प्रश्न कधी त्याच्या 'झ्याट के बाल' जिंदगीत आलाच नव्हता.
पोटाची भ्रांत आकड्यावर भागवायचे दिवस गेले, तसा त्याने गल्लीत हफ्ता सुरू केला.
साल दो साल बरी गेली, पण मध्ये रावण आला.
त्याच्या पोरांनी फांदा मारला. व्होल एरियाची कलेक्शन बीट केली.
वशा उपाशी. पयले त्याने डबल तोडणी चालवली,
पण एक दिवस मॅक्सीभायने त्याला, मावशीच्या पट्टयावर घेतला.
हा sss घुमवला भ्यांचोद!
वशा हनुमान, वर एरियात इज्जतचा पंचनामा.
तीन दिवस एडमिट होता केईएमला.
पोरांनी तीन दिवस संत्रा मालिश केलं, तेव्हा सूज उतरली, भ्यांचोत, आहात कुठे?
वशा मग असूलवर गेला. एरिया का असूल.
एक एरिया में दो कुत्ते नहीं हग सकते!
एक की बू दूसरे को बर्दाश्त नै होती ना! या तो मैक्सीभाय हगेगा नै तो वशा.
उसके पास हुसेनभाय ने दियेला उस्तरा था कायके वास्ते?
सुना था मॅक्सीभाय चक्री रखता है।
अब सोचना पडेगा ना!
चक्री को 302 देना था..,
ओ भी उस्तरेसे.

... सोच भड़वे सोच!

No comments:

Post a Comment