Thursday, November 12, 2015

१४. गोष्टी सांगणारा माणूस...


Keshavrao's wife has problems!

आता यात दचकायला काय झालं? प्रॉब्लेम्स नसतात का कुणाला?
आता प्रॉब्लेमचं भाषांतर तुम्ही, 'लफडं' असं केलंत तर तो तुमचा प्रॉब्लेम!
 प्रॉब्लेम्स आर प्रॉब्लेम्स आफ्टरऑल. आता लफडं नाही आणि प्रॉब्लेम म्हटल्याबरोबर तुम्हाला,
menstrual किंवा ovarian problem वाटायला लागला ना? पुन्हा डोके....... आपलेच!...
केशवराव उर्फ़ केश्या, हा ज्या समाजात कर्तृत्वहीन माणसाला, केवळ वय वाढले आणि तो पुरुष आहे
या भांडवलावर राव, पंत वगैरे उपाध्या प्राप्त होतात, अशा समाजात जन्मल्याने केश्याचा केशवराव झाला,
या बद्दल बायकोला आक्षेप नव्हताच. ती तर प्रथा होती- परंपरा होती. खरा प्रॉब्लेम वेगळाच होता.
केशवराव आजकाल स्वत:ला शाहरुख समजू लागले होते. जेव्हा ते बायकोशी बकरी बेम्बटल्याप्रमाणे बोलू लागले, तेव्हा ती अंमळ टेन्स झाली.
नंतर ते सारखे विरळ केसांतून हात फिरवू लागले, बाजारात कांदे-बटाटयांची पिशवी खांद्यावर घेऊन तिच्या पाठी फिरताना
अचानक दोन पाय लांब करून, एका पायावर झुकत, दोन्ही हात वर करीत, मान डोलवू लागले.
आता बाई घाबरल्या, कारण केशवराव शाहरुख झाले म्हणून त्या काजोल बनणे कशाला, गौरी बनणेही शक्य नव्हते.
त्यांच्या आयुष्यात इतका गंभीर पेच कधीच पडला नव्हता. आपण काय मागितले आणि हे काय नाशिबी आले,
असे त्यांना होऊन गेले. एरव्ही केशवराव ढगळ- बिन इस्त्रीचा बुशकोट घालत, हात धुवून गंजिफ्रॉकला पुसत,
जेवल्यावर करपट ढेकरा देत आणि रात्री बिछान्यात..............
सांगितलं ना, डोकं.... तुमचं !
..... रात्री झोपेत - डिझेल ट्रक सुरू केल्यागत घोरत! वाट लागली बायकोच्या आयुष्याची!
मग तिला नवस सांगितला, भावडीच्या सुनेने. दक्षिणेत कुठेसे गॉगलवाल्या देवाचे मंदिर आहे,
तिथे जा, नवस कर, जो हवा तो हीरो माग, महिन्यात केशवराव तसे होतील.
बाईंनी केशवरावांना भरीला पाडले आणि पार दक्षिणेत नेले.
गॉगलदेव भारी होता. क्षणभर तोच मागावा, असा त्यांना मोह झाला,
पण तो ही केशवरावांसारखाच एयरपोर्ट आहे हे पुजाऱ्याने सांगितल्याने बाईंनी बेत बदलला.
आपला आवडता हीरो मागितला, आणि हे नशिबी आले!

काय झाले, त्यांनी आयुष्यात प्रेमराज येऊं दे अशी कामना केली तेव्हा त्यांच्या डोक्यात होता प्रेम, मिळाला राज!
तोही कोटिंग होऊन नाही, सर्किट मॉडिफाय होऊन!

गॉगलदेव फ्रॉड आहे, असे त्या हल्ली जिला-तिला सांगत असतात.

No comments:

Post a Comment