नाटकवाल्या मित्रांच्या समुहात एक लघुपट शेयर झाला.
दक्षिणेत बनला होता आणि त्याची वन-लाइन, "आईचे काळीज" या प्रख्यात कथेवर आधारित होती.
मूळ कथाच भावनांचा चपखल उपयोग करून बांधलेली आहे.
त्यानुसार या कथेतही आजची (आईचीच) समस्या, मांडलेली आहे.
मूळ कथेत सुनेने आईचे काळीज मागण्याचे कारण देण्याची गरज लेखकाला भासली नव्हती.
या फिल्ममध्ये मात्र सुनेचे सासूशी रक्ताचे नाते आणि त्यामुळेच कणव नसणे गृहीत आहे.
दोन्ही कथा आजच्या तरूण स्त्रीकडे संपूर्ण वाईटपण देतात ...
आणि पुरुषाकडे हतबल चांगुलपण.
( male chauvinism?) योगायोग की ....
तर घरात अंथरुणाला खिळलेल्या आईचा त्रास झालेला, अर्थातच पत्नीला.
तिने आईची देखभाल करायला साफ नकार देणे.
मुलाचे आधी वाद घालणे- मग हतबल होत, आईला वृद्धाश्रमात ठेवाण्याच्या निर्णयाप्रत येणे.
तिला वृद्धाश्रमात सोडतात. परतताना मुलगा ठेच लागून पडतो.
आईचे काळीज हलते. तिच्या पायात बाळ येते, ती मुलाकडे जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवते.
आठवणी दाटतात. कधी त्यांनी तुम्हाला आधार दिला, आज तुम्ही त्यांचे आधार बना, हा संदेश देत लघुपट संपतो.
लघुपट संपतो, प्रश्न उरतात. आमच्या प्रत्येक रूपक कथेमध्ये आम्हाला पुरूष हा मूळात चांगला आणि परिस्थितीने हतबल का लागतो?
कथेतील दोन बायकांपैकी एक, सहसा सून, नेहमी वाईट का असते?
या मेलोड्रामाचे काय करायचे?
आम्हाला मेलोड्रामा (च) का लागतो?
परवा मंचावरून जेष्ठ समीक्षक अशोक राणे सांगत होते.
एका महोत्सवात ते आणि विजय केंकरे यांत तासभर चर्चा झाली. ते ‘मेलोड्रामा’वर बोलत होते. आणखी प्रश्न !
मेलोड्रामा तुमच्या तौलनिक आकलन, संकेत चौकटी आणि सामाजिक स्थितिशी निगडीत टर्म नाही का?
मेलोड्रामाचे डीमार्केशन संभव आहे?

No comments:
Post a Comment