Monday, November 9, 2015

११. गोष्टी सांगणारा माणूस...


तुम्ही कधी कुणाला घरातून पळून गेलेला पाहिलाय?
म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की अमुक एक घरातून पळून गेला किंवा गेली.
पण अक्च्युअली पळताना पाहिलाय?...
एम् शोर यु मस्ट हॅव नॉट...
मी पाहिलाय...
एकदा नाही अनेकदा पाहिलाय!

लफड़ा असा की गोंडा ठाकुर घरून पळायचा तेव्हा फ़क्त बेंड-बाजा-बारात काढणे बाकी असे.
 म्हणजे गँग त्याला नेहमी म्हणे,
"यार गोंडा, नेक्स्ट टायम भागशील तर आधी खबर दे. आम्ही कच्छी ढोल लावू."
पण गोंडाने तो मौका कधी दिला नाही.
बाकी गोंडा घरुन पळण्याआधी आमची चांदी असायची.
त्याची कुठेतरी चाँदी झाली की आम्ही पार्कात घुमायचो. जबरा खातिर व्हायची आमची.
नेक्स्ट डे गोंडा गुल!!
पळायला हरिण होता गोंडा!
पळायच्या आधी सेफ डिस्टेंसवर दिसायचा, घरच्यांना.
सगळे पकडायला धावले की चप्पल हाती घ्यायचा. नौ दो ग्यारा !
मग त्याचा शोध पुढे अनेक दिवस चाले.
वेताळाच्या जंगलात काय असतील अशा दंतकथा पसरायच्या गोंडाच्या.
तो रेल्वे स्टेशनला टीसी म्हणून उभा होता,
ते पोलिसांच्या मेंढीत तो पोलिसांना रस्ते दाखवत होता.
शाम्याला पुलावर हॉकर लोक ठोकत होते तो कुठून गोंडा आला आणि मांडवली केली.
एक का दोन.
असे हफ्ते गेले आणि पब्लिकचा इंटरेस्ट कमी झाला की,
पुन्हा मोक्याच्या वेळी गोंडा दिसायचा.
पब्लिक पकडायला धावायची...
भागने में हिरन को पीछे छोड़नेवाला गोंडा....
अल्ला sss द हाथ लग जाता.....

किसी दिन फिर भागने....

No comments:

Post a Comment