Sunday, January 1, 2012

बुडवलेल्या कविता- ५


व्याकरण

ज्याला केवळ नाम आहे
असा एक कर्ता घ्यावा
क्रिया विशेषणं चिकटवावीत त्याला
क्रियापद नसलं तरी चालतं

विशेषणं पसरत जातात
पाण्यावरच्या तरंगांगत
क्रियापद जातं खोल तळाशी
दगडागत ...
केवळ नाम असलेला कर्ता
 आदरार्थी बनतो
क्रियापद आहे पडून
तळाशी... दगडात !
क्रियापदाला
बिचार्‍या एकट्याला
या जगात किंमत नाही
मिळणार्‍या उपाध्या सगळ्या
विशेषणं तर लावतं

ज्याला केवळ नाम आहे
असा एक कर्ता घ्यावा
क्रिया विशेषणं चिकटवावीत त्याला
क्रियापद नसलं तरी चालतं
असं व्याकरण चालतं राजा
...जगात व्याकरण चालतं!
-आभास आनंद 

No comments:

Post a Comment