Sunday, January 1, 2012

बुडवलेल्या कविता- ३


गर्ता


आजकाल या जगाचं काय खरं नाय
त्याचं काय होणार काय कळत नाय
कारण ...
माझं काय होणार तेच मला कळत नाहीये
जगाचा नाश सुचतोय आता
नशिबाने माझ्या खाताच गोता
तोवर या जगाला विचारतो कोण लेकाचा
ते पण तुला मला पुसत नाहीये

इंचा-इंचावर वारूळ किड्यांचं
संच झालय आता जगाचं
किड्यापासून किड्याला वेगळं
अस्तित्वच उरलं नाहीये

पैदा होऊन पस्तावलेत
असे दोन जीव माहीत आहेत
कदाचित माझे दोन डोळे
कदाचित
मनाची दोन शकलं
ती पैदा होऊन पस्तावलीत
गंजत पडून सर्दावलीत
बेडर थोडीशी झालीत ती
कदाचित त्यांचं त्यांना आता
मनच उरलं नाहीये
आजकाल या जगाच काय खरं नाय बाबा ...
 - आभास आनंद

No comments:

Post a Comment