गर्द झाडीत लपून ...
गर्द झाडीत लपून मी
जगाकडे बघत होतो
बघता बघता हरवत होतो
कणाकणाने संपत होतो
जगण्याची नशा अशी होती
दारू झ्याट का बाल होती
पब्लिकला जरी पसंत नव्हती
मला काय पडली नव्हती
जीवनदाते अनेक होते
कान कोरणारे कितीएक बागेत
स्टेशन वरती हमाल होते
पारावरचे देव होते
स्वार्थी जगाला लाथाडण्याचा
गांडीत जेव्हा दम होता
जगात आपलं कोणीच नाही
हाच विचार मनात होता
समविचारी सोबत होते
त्यांना उडता येत होते
मी ही पंख लावून घेतो
दुंनियेला फाट्यावर मारतो
पिसा सारखा हलका होतो
देह मलाच झोके देतो
जगाचा एक मच्छर होतो
अपून मात्र शेर होतो
काळाचे हिशेब जरूर चुकतात
डोक्यात घणाचे घाव पडतात
झाडीत लपणे चुकले तर
भूकंपाचे धक्के बसतात
अशी वाटचाल सुरू होती
निश्चित दिशेला गती होती
माझे जीवन आणि मृत्यू
यांच्यामध्ये लय होती
चाळण उडवून शरीराची
मृत्यूकडे धावताना
माझाच वेग जास्त होता
तसा तुमचा कोणाचाच नव्हता ...
- आभास आनंद
No comments:
Post a Comment