थोडा देवधर्म
एक होता दगड होता काळा गोळा
कुणीतरी त्याच्या डोई लावला शेंदूर टिळा
दगड होता काळा शेंदूर त्याच्या गळा
देव-देव म्हणत सारे लोक झाले गोळा
दगडा भोवती दगडांचाच जमला एकच मेळा
भजने आणि गाणी गाती रोज काढून गळा
एक दगड काळा आणि एकच शेंदूर टिळा
रोज खोर्याने आता तिथे पैसे होतात गोळा
एक धूर्त त्या पैशांवर ठेवून असतो डोळा
त्यानेच तर लावला होता दगडावरती टिळा
असा समाज भोळा सुखाकडे डोळा
येडा म्हणतो देवा सोडा माणसाकडे वळा
- आभास आनंद
No comments:
Post a Comment