Friday, November 27, 2015

२४. गोष्टी सांगणारा माणूस... न्यूरेनबर्ग स्पीच.


[ पडदा उघडताना अंधार. हिटलरच्या बर्लिन मधील एकाद्या भाषणाचा आवाज येतो.
लोकांच्या टाळ्या. अंधारात एक मोठी पडछाया हातवारे करत आहे.
तिच्या मालकावर हळुहळू उजेड. एडोल्फ हिटलर चान्सलर होण्यापूर्वी देत असलेले एक भाषण.]

हिटलर :
 ...आमचं असं ठाम मत झालेलं आहे की राष्ट्रसंघ निर्मितीपुर्वीचा काळ हा जर्मनीसाठी जास्त सन्मानाचा आणि जास्त माणुसकीचा होता...
 आम्ही विचारलं युद्ध आवश्यकच आहे का ? तर हे ज्यू शांतीचे दूत म्हणाले, नाही!
देशां-देशां मधला वाद, एकाचे हक्क दुसरा हिसकावून घेतो तेव्हा निर्माण होतो... असे वाद राष्ट्रसंघ शांततेच्या मार्गाने सोडवेल!
हा ! मला असा एक देश बघायचाय जो अन्याय झाल्यावर या संघाकडे येईल
आणि राष्ट्रसंघातल्या ताकदवान देशांविरूद्ध न्याय मिळवून दाखवेल.

आमच्यावर महायुद्धाला सुरुवात केल्याचा आरोप आहे.
व्हर्सोयच्या तहात आमची लांछनास्पद मानहानि केली गेली ! कलम चौदा हे ते मानहानीकारक कलम !
आम्हाला हत्यारे बनवायला बंदी, सैन्य उभारायला बंदी, जहाजं बनवायला बंदी आणि व्यापारालाही बंदी !?
कलम २३१- महायुद्धाला जबाबदार जर्मनीच असून या गुन्ह्याबद्धल तिने २२६ दशलक्ष राईशमार्कस इतकी भरपाई करावी!
 जर्मन आर्यांनो, हा तह नाही... जर्मनीचं कफन आहे ! मान्य नाही आम्हाला व्हर्सायचा तह !
कोणी केला हा तह !? सप्टेंबरचे गुन्हेगार ते हेच, ज्यू ! मी म्हणतो, जर्मनी युद्धात, रणावर हरलीच नाही...
तर घरच्या भेदी ज्यूंमुळे हरली ! मला सांगा, अमेरिकेला जर्मनी विरुद्ध युद्धात कोणी पाडलं ?
.. युरोपच्या महायुद्धात, अमेरिकन ज्यूंच्या कारखान्यांनी शस्त्रं पुरवली... महाप्रचंड धंदा केला... शस्त्रांची जागतिक शेती !
पण एव्हढ्याने या लालची ज्यूंची तहान भागली नाही..
म्हणून मग, ज्यू सटोडियांच्या तालावर चालणार्‍या हर्स्ट प्रेसने जर्मनी विरुद्ध गरळ ओकायला सुरुवात केली.
जागतिक अशांती आणि युद्धांमध्ये या ज्यूंचा नेहमी मोठ्ठा फायदा होतो... आणि म्हणून हे युद्ध लढवतात.
मध्यआशियातून आलेला एक साधा ज्यू व्यापारी युरोपमध्ये पंतप्रधान व्हायची स्वप्नं पाहायला लागला...
 का ? ... कसा ?... युद्धातील नफेखोरीमुळे आलेल्या प्रचंड पैशांतून, हा माज यांना आला !
या ज्यूंचा छुपा हेतू आहे, जगाची सत्ता काबिज करणे!
जागतिक युद्धं आणि क्रांती ही संधी त्यांना मिळवून देताहेत. ह्या संधी मिळाव्यात म्हणून आमच्यावर युद्ध लादली जाताहेत !
हे म्हणाले क्रांति करा ! केली ! युरोपीय राजसत्तांचा पाडाव क्रांतीनेच केला गेला आणि यातही या ज्यूंनी अमाप फायदा उकळला !
संख्येने हे आमच्या एक टक्का ही नाहीत, पण व्यवसाय, शिक्षण, कला, संस्कृति
यामध्ये प्रचंड आक्रमण करून यांनी एकाधिकारशाही निर्माण केली आहे...
म्हणूनच आपला लढा फक्त आर्थिक नाही, तर सामाजिक आहे.. सांस्कृतिक आहे !

... आता बस्स ! सार्‍या जगाला आता कळलं आहे की ज्यू हा युरोपलाच नाही तर सार्‍या जगाला जडलेला गुप्तरोग आहे.
महा ज्यूंचा प्रश्न सोडवल्याशिवाय युरोपला शांतता लाभणार नाही !
माझ्या आयुष्याने मला अनेकदा भविष्यवेत्ता केलं ! आज मी पुन्हा एकदा भविष्यवेत्ता होऊन सांगतो...
 जागतिक व्यापारातल्या अमाप संपत्तीच्या जोरावर, ज्यूंनी युरोपला पुन्हा एकदा महायुद्धाच्या आगीत लोटलंच तर...
त्या महायुद्धाच्या झळा फक्त युरोपलाच बसणार नाहीत ! ज्यूंना ही भोगाव्या लागतील...
या युद्धाचे परिणाम बोल्शेविक क्रांतिमध्ये होणार नाहीत तर संपूर्ण युरोपमधून ज्यूंच्या नाहीसे होण्यामध्ये होतील...

[ प्रचंड टाळ्या. हिटलर आपला हात नेहमी प्रमाणे पुढे करतो. हेल हिटलर ! चे जयघोष दुमदुमतानाच अंधार.]

२३. गोष्टी सांगणारा माणूस...स्थलांतर


बालक ऋषिराज जन्मला तेव्हाच त्याला US ला सेटल करायचे ठरले.
नाव ऋषिराज अर्थात त्याच्या आजीने ठेवलेले. आजोबा दुर्वास किंवा जमदग्नी कॅटेगरीतले.
स्वदेशी चळवळीतून प्रेरणा घेऊन ते नित्यानेमे अंमळ देशी लावायचे म्हणून दुर्वास.
 ऋषिराजला संस्कृत आणि संस्कृति परायण करण्याच्या प्रयत्नात होते,
तेव्हा दुर्वासपुत्र उर्फ ऋषितात, ग्रीनकार्ड आणि इतर नियमांची छान -बिन करत होते.
दुर्वासपत्नीकडून बालक ऋषिराज जेव्हा गीतेतील अध्याय सुरात
आणि अर्थाची अजिबात चिंता न करता मुखोद्गत करत होते,
तेव्हा ममी नावाच्या घरात नव्याने घुसलेल्या असंस्कृत वस्तूने बालकास कुक्कुट गर्भ खावयास घालून हाहा:कार उडवून दिला.
बालक पंचम वयीन होताच त्यांस हिंदोस्तानी संगीताचे धडे सुरू करीत सेंट फ्रान्सिस नामे आंग्ल पाठशालेत प्रवेश मिळवून दिला.
असे प्रगति आणि संस्कृतीरक्षण एकसमयावच्छेदेकरून सुरू होते.

बालक ऋषिराज सर्व क्षेत्रांत प्रथम राहील हे पाहणे, ममी नावाच्या वस्तुचे प्रमुख कार्य होते.
या व्यतिरिक्त फावल्या वेळात करमणूक म्हणून तिने बँकेत वगैरे सेवा देण्यास दुर्वासांची काही हरकत नव्हती.
ते एकाचवेळी संस्कृतीरक्षक आणि प्रागतिक विचारांचे होते.
दुर्वास पत्नी दुपारी श्रांत महिला मंडळात रसाळ आणि सुश्राव्य अशी
हिन्दी चित्रपट गीतांच्या चालीवर बांधलेली भजने गात आपला संस्कृती रक्षणाचा कोटा पुरा करीत.
त्याचवेळी दुर्वास आपले स्वदेशी व्रत अंगिकारित असावेत, असा ऋषितातास संशय होता, पण पुरावा नसल्याने ते गप्प राहिले.
पुरावा अर्थात घरातील पाण्याच्या टाकीमागे दडवून दुर्वासांनी ती सुरू-बंद करणे आणि भरेपर्यंत शिडीवर उभे राहणे,
हे काम मोठ्या आवडीने स्वीकारले होते. प्रगतिशील कुटुंबात असेच सर्व घटकांचे कार्यरत असणे अभिप्रेत असते.
तरच संस्कृती टिकते आणि तिचे संवर्धन होते.

सेंट फ्रान्सिस नामक शाळेची प्रेयर जेव्हा बालक घरी ' ओ द अलमाइटी..' वगैरे स्वरांत मुखोद्गत करू लागले,
तेव्हा ईश्वर एक आहे, हे दुर्वासांनी ठणकावून सांगितले, त्यामुळे संस्कृती अबाधित राहिली.
शालेय शिक्षणाच्या प्रथम वर्षांत जेव्हा वर्गमित्राच्या बर्थ-डेला केक खाण्याची वेळ आली तेव्हा,
त्यांस परवानगी नाकारली गेली. त्याने घरी काय ते खावे, पण चारचौघांत संस्कृतीचे पालन करावे असे सर्वानुमते ठरले.
ऋषितात मात्र त्यावेळी वसईच्या मित्राकडे कुक्कुट सुपाचे आस्वाद घेऊ लागले होते.
बघता बघता ऋषिबाळ मोठे झाले आणि ९५ प्रतिशत गुण प्राप्त करीत
शालान्त आणि कनिष्ठ विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण झाले, कारण ते अपरिहार्य होते.
त्या नंतर लगेचच बालक ऋषिराज यांची रवानगी सरकारी कोशातील डॉलर्सचा विनियोग करीत,
स्थापत्यशास्त्राचे उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत करण्यात आली.
तेव्हा कोलंबसाने शोधलेला भारत, म्हणजेच अमेरिका, असा युक्तिवाद दुर्वास करू लागले.
तोवर ते त्यांच्या निवृत्तकर्मचारी हास्य मंडळात हास्याचा विषय झालेलेच असल्याने सभासदांस वेगळे हसण्याचे प्रयास होत नसत.
दुर्वास बोलले की मंडळात हास्याचे स्फोट सुरू होत. याने विभागातील शांतताभंग होत असल्याची तक्रार पोलिसांत आली होती,
पण तपासावर आलेले पोलिसही भरपेट हसू लागल्याने त्या विरूद्ध कोर्टात याचिका करावी असे तक्रारदारांस
म्हणजे दुर्वास यांचे खडूस शेजारी, आणि मंडुकशास्त्री असे टोपणनाव दिले गेलेले, बेडेकर (बेडूक!) यांस सुचवले गेले.
पण खर्च फार असल्याने त्यांनी तो बेत रहित केला.
त्या ऐवजी ऋषितातास, बाल्कनीत तुळशीच्या कुंड्या ठेवून सोसायटीचे नियम तोडल्याच्या पोलिस तक्रारीत गोवून,
ऋषीराजाचे अमेरिकेला जाणे अशक्य करावे, असा नवा उपाय त्यांना सुचला.
अशा खमक्या योजना त्यांस नित्यनेमाने सुचत, त्यामुळे आपले बेडेकर नाव मुंडकेश्वर असे बदलून घ्यावे, अशी इच्छा त्यांस होत होती.

सर्व अभद्रांवर मात करून आणि कुलस्वामिनीस चांदीचे मुकुट दान करून, ऋषिराजास अमेरिकेत धाडले गेले.
तिथे स्ंनातकोत्तर प्रशिक्षण घेऊन बालक तिथेच स्थिर झाले. अमेरिकेत दीड शतकांपूर्वी इटलीतून स्थलांतरित झालेल्या
कन्यकेशी त्याचा एका सुमुहुर्तावर विवाह संपन्न झाला.
त्यावेळी आर्य हे मूळ इटली आणि रोममधून भारतात स्थलांतरित झाले असा रोमांचक युक्तिवाद दुर्वासांनी केला
आणि त्यासाठी स्वरचित 'आर्यांचा इतिहास' या पुस्तकातील दाखले दिले.
या पुस्तकाचे नंतर जाहीर वाचन करायचे हास्यमंडळातर्फे ठरले.
पण विभागातील शांतताभंग होईल या डेसीबलिक कारणाने पोलिसांनी ते डीसेबल केले.
काही वर्षांनी ममी नावाची असंस्कृत वस्तू आणि ऋषितात कोलंबसी भारतात,
आद्य आर्यकुलीन स्नुषे सोबत स्थिरावण्यास निघून गेले.

तिथून ते सध्या भारतातील असांस्कृतिक राजकीय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असतात.

२२. गोष्टी सांगणारा माणूस... भागती अमावस्या


पूर्वेकडील पहाडी प्रदेशात एक प्रथा आहे... 

ज्याने कुणी अमावस्येच्या रात्री जंगलातील डाकिणीच्या झिंझ्यातला एक केस काढून आणेल,
त्याला कुबेराचा खजिना प्राप्त होतो.
त्यामुळे हा केस मिळवण्यासाठी पहाडी पोरां-सोरांपासून, म्हाताऱ्या-कोताऱ्यांपर्यंत सर्वांत एक चढाओढ असते.
हा केसही काढायचा तो, 'भागती' अमावस्येला.
भागती अमावस्या ही सर्व अमावस्येंतील खतरनाक मानली जाते.
म्हणून त्या अमावस्येला संध्याकाळी सातलाच जेवण-बिवण आटोपून ‘जोंगोल बोश्ती’ झोपी जाते.
साडेसातला जरी गेलात, तरी मिट्ट अंधार आणि सन्नाटा.
अशा गावात जायला, संध्याकाळी सातला ‘जोंगोल बोश्ती’ला पोहोचू या बेताने मी आणि केएम, दार्जिलिंगहून निघालो,
पण वाटेत फॅनबेल्ट लुज होऊन आम्ही पोहोचेस्तोवर आठ वाजून गेले. राह में सन्नाटा.
गाडीवाल्याने वाजवून दोनशे रुपये सवारी घेऊन आम्हाला रस्त्यावरूनच खाली जंगल बस्ती दाखवून सोडले.
आज भागती अमावस्या असल्याने मी आणि केएम, डाकिणीला पहायला तिथे आलो होतो.

 आता जंगलात उतरणारा मळका खडकाळ रस्ता उतरायचे.
केएम तिथला स्थानिक, त्यामुळे मला एरियाची खासियत, इथे-तिथे टॉर्च फेकत सांगत होता.
इथे ब्रिटिश काळात एक शांतो बॅनर्जी नावाचा रईस चहा मळेवला राहत होता.
त्याने बांधलेला वाडा आज ओसाड पडून आहे.
शांतोला एव्हढा पैसा असूनही कुबेराचा खजिना हवा झाला,
आणि तो भागती आवसेला डाकिणीच्या झिंझ्या उपटायला घोड्यावरून निघाला.
सकाळी फ़क्त घोडा परत आला.
शांतो नंतर कधीच कुणाला दिसला नाही. त्याचा वाडा पडून राहिला आणि कालांतराने दंतकथा झाला.

 आम्हाला वाटेत एक वळलेली पायवाट दिसली. केएम म्हणाला, ही काली मंदिरच्या खण्डहरकडे जाते.
तिथे हल्ली कोणीच जात नाही, डाकिणीच्या भीतीने. आपण जाऊ. निघालो.
सहा डिग्री थंडीने काकडत होतो, फुल बदन लपेटून फायदा होत नव्हता.
त्यात डाकिणीच्या एरियात मणक्यातून चिल शिरशिरी. रस्ता असा नव्हताच.
जाळी, पाने बाजूला करत आम्ही पडक्या मंदिरापर्यंत पोहोचलो.
ती नुसती वास्तू आमची तीन हात करत होती. आर या पार. 
डाकीण भेटलीच, तर केएम कुकरी आणि मी कडकडी घेऊन तयार होतो.
आम्ही मंदिर शक्य तितक्या बाजूने फिरून पाहिले. डाकिणीचा पत्ता नव्हता.
आम्ही परत जायला वळलो. रस्त्याला यायला फक्त केएमचा अंदाज होता.
मला वाटते आम्ही चुकलो. आणि भलतीकडे गेलो. तिथे एक उतार होता.
आम्ही खाली पाहिले, टॉर्च पोहोचत होता, तिथवर अंधार होता. काही कळत नव्हते.
उलटे वळणार तोच, अंधाराच्या भुयारातून टापांचा आवाज ऐकू आला. काहीतरी येत होते.
केएम ने टॉर्च बंद केला. अंधारात डोळे फाडून आम्ही पाहत होतो.
काहीतरी सफेद, घोड्यासारखे दिसले. त्यावर काहीतरी बसलेले.
ते वाढत होते! पाच फूट-दहा फूट- वीस – च्यायला !! केएम बोलला, "भाग साले!!"

आणि आम्ही उलटे पळत सुटलो. केएम क्षणभर टॉर्च फेकायचा, बंद करायचा.
आम्ही अंदाजे पळत होतो. झाडे, फांद्या, काटक्या आणि पायाला दगड- बोचून काढत होते.
आम्हाला रस्ता दिसला. तो समोर गावात जात होता.
भागती अमावस्येच्या किर्र रात्री आम्ही
संध्याकाळी सातलाच गपगार झालेल्या ‘जोंगोल बोश्ती’कडे धावत होतो.

२१. गोष्टी सांगणारा माणूस... बत्तेचाळीस


बत्तेचाळीस हे असे वय आहे, ज्यात तुम्ही तरुण,प्रौढ, वयस्क, कशात येत नाही.
माणसाने कायम बत्तेचाळीसमध्ये रहावे.
जे बत्तेचाळीसांत बसत नाहीत, त्यांनी जन्मतारीख, कुंडली एडजेस्ट करून बत्तेचाळीसांत बसावे.
फिट बसावे, हिट दिसावे.
टमरु बत्तेचाळीस झाला त्याला आता दहा-वीस वर्षे होऊन गेली असतील. तो अजून बत्तेचाळीसच आहे.
बत्तेचाळीसमध्ये माणसाची बौद्धिक वाढ खुंटते- फ्रीज़ होते. तो युगानुयुगे बत्तेचाळीसमध्ये राहतो.
मी माझ्या आजुबाजूला अनेक बत्तेचाळीस पाहिले.... त्यात पुरुष होते- स्त्रियाही होत्या.
तेव्हा पुढे कधीतरी आपण बत्तेचाळीस होऊ असे माझ्या ध्यानातही आले नव्हते.

बत्तेचाळीसचा मानव सत्य हाती गवासल्यासारखा ठाम होतो.
माणूस निवृत्त झाल्यावर त्याची इनकम बंद होते, तशी त्याची बौद्धिक इनपुट बंद होते.
एकप्रकारे बत्तेचाळीस म्हणजे बैद्धिक निवृत्ति घेतलेला माणूस.
मजेदार बाब म्हणजे या वयात त्याचे वाचन-चिंतन वगैरे सुरूच असते.
मात्र त्याची मते मागेच् कधीतरी सत्य ठरल्याने या वाचनातून-चिंतनातून नवे काहीच गवसत नाही.
असे अनेक बत्तेचाळीस देशात मिनिटागणिक पैदा होत आहेत.
लोकसंख्यावाढीचा प्रश्न यापुढे काहीच नाही.
बत्तेचाळीस हा राष्ट्रापुढला मोठा धोका आहे. कॉंग्रेसी किंवा भाजपा वगैरे नाही.
जर राष्ट्राचे संपूर्ण बत्तेचाळीसीकरण झाले, तर आपल्याला स्वातंत्र्य, बत्तेचाळीसला मिळाले, असे मानावे लागेल.
आपण आपल्या आजुबाजूस बत्तेचाळीस किती आहेत याची जाणीव ठेवायला हवी.
त्याची शक्य झाले तर सरकार-दरबारी नोंद ठेवायला हवी.
हे करताना आपण बत्तेचाळीस झलेलो नाही, याची आवर्जून तपासणी करायला हवी.
 बत्तेचाळीस हा एकप्रकारे बौद्धिक देवानंद आहे.
त्यामुळे तो 'चालताना' लटपटत असतो, मात्र याला तो बैठक असे स्टायलिश नाव देतो.
 या बत्तेचाळीसांमुळेच राष्ट्रात सांप्रति फेसबुक प्रदेशी वा इतरत्र अनेक वाद चिघळताना दिसतात.

पुर्वी माणूस शारीरिक वय बत्तेचाळीस पार पडले की, बत्तेचाळीस होत असे.
आज 'सोमी' मुळे माणूस विशीतच बत्तेचाळीस होऊ लागलाय,
हा राष्ट्रापुढील गहन चिंतनाचा विषय आहे.
मात्र हे गहन चिंतन करण्यासाठी बत्तेचाळीस पदास न पोहोचलेले विचारवंत कुठून आणायचे?
त्यासाठी निविदा मागवाव्या लागतील.
पण समजा निविदाही बत्तेचाळिस आल्या तर?

२०. गोष्टी सांगणारा माणूस... धंदा समाजवादाचा- २


वर्षे गेली आणि धन्नोच्या समाजवादी बापाला झटका आला.
त्याने धन्नोला अल्टीमेटम दिला.
अठ्ठेचाळीस तासांत पोटापाण्याचं काय करणार ते ठरव. समाजवादाचं काही खरं दिसत नाही.
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचे डिपॉझिट काठावर वाचले होते.
ऑपोजिशनने मिरवणुकीत गाणी पण म्हटली होती.

 "गजा रे गजा काय तुझी मजा,
समाजवादाचा वाजवतो बाजा,...
डिपॉझिट वाचलंय थोडक्यावरी
न गजा बसलाय घोडीवरी."


समाजवादी राजकारणावर पोराला पोसता येणार नाही,
हे लक्षात आल्यावर बापाने धन्नोला 48 तासांचा अल्टीमेटम दिला.
धन्नो टेन्स होऊन मॅकला घेऊन माझ्याकडे आला.
"अड़तालीस घंटे में सोचो, बिझनेस क्या करनेका? सोचने का रिवॉर्ड मिलेगा!"
या देशात विचार करायचे पैसे मिळतात, हे आम्हाला पहिल्यांदा कळलं.

पुढचे अठ्ठेचाळीस तास, धन्नो बियरवर होता, सोबत आम्ही होतो.
फ़क्त लंडन पिल्सनर आणि विचार! धन्नोला कोणता क़ारोबार सूट होईल?
मॅकने स्टेशनवर तीन पत्ते फिरवण्यापासून, लकी सोडत स्किमपर्यंत अशा आयडिया दिल्या की,
मॅक देशाचा अर्थमंत्री झाला, तर देश कुठच्याकुठे जाईल, यावर आमचे एकमत झाले.
मात्र त्याच्या स्किमवर अंमल केला तर धन्नो कुठल्याकुठे न जाता बाराच्या भावात जाईल,
याचा आम्हाला अंदाज आला.
त्यातल्यात्यात मॅकने दिलेला बरासा धंदा होता, मंदिर टाकणे!
फूल टू कमाई आणि नो टॅक्स.
पण धन्नोचा बाप समाजवादी असल्याने मंदिराचा बेत मागे पडला.
धन्नोला समाजवादी टच असलेला कोणता धंदा द्यावा? समजेना.
यात भांडवलदार LP कंपनी मात्र रईस होत होती.
अठ्ठेचाळीस तासांनी निर्णय झाला. काहीच करायचे नाही. एकदम समाजवादी धंदा!
पैसेवाल्याकडून उधार घ्यायचे, गरीबाला मदत म्हणून.
सहसा तो परत मागत नाही. मागितले, तर दुसरा रईस पकडायचा.
त्याचा माल पहिल्याला द्यायचा. 52 दिवसांचे क्रेडिट रोलिंग!
दुसऱ्याने मागितले की तिसऱ्याकडून घ्यायचे! दुसऱ्याला द्यायचे!
सगळ्यांना सामान वाटणी की आला समाजवाद!

मॅक देशात समानता आणू शकेल असा एकमेव अवलिया आहे.
"अरे, पण बापाने विचारले, कसला धंदा करतोस? तर...?
"त्यात काय आहे? सांग रोलिंगचा धंदा!"
जगातील पहिल्या समाजवादी बिझनेसच्या शोधाचे श्रेय, मॅककड़े जाते !

१९. गोष्टी सांगणारा माणूस... धंदा समाजवादाचा- १


धन्नोचा बाप समाजवादी नेता होता.
म्हणजे जेव्हा समाजवादी फॉर्मात होते, तेव्हाची गोष्ट.
समाजवादी फॉर्मात कधी होते? तर होते एकदा.
खूप-खूप वर्षांपूर्वी समाजवादाला बरें दिवस होते,
तेव्हा चड्डीला कंटाळून काही लोक समाजवादी झाले, त्यात धन्नोचा बाप होता.
पण तो ज़माना जाऊं दे, मी धन्नोची इस्टोरी सांगतोय.
तर समाजवादी बापाचा लेक काहीच करे ना!
समाजवादात सर्वांनी कष्ट करायची गरज नसते, असे त्याने कुठेतरी वाचले.
राबवले.
बापाशी वाद झाला तेव्हा त्याला पटवून दिले!
लायसन्स टू चिल!
धन्नो सकाळी स्टेशनरोडला पुलावर हमाल- कड़ियांत असायचा,
रात्री भाजीमार्केटचे भैये भिशीवर राहयाचे, त्यांत असायचा.
सकाळी सातारी आणि रात्री लंगरवर.
बाप खुश... पोरगा नाव काढणार...
गरीब, पददलित आणि उपेक्षित, म्हणजे समाजवादाचे फ्यूअल. 
सगळा  करोबार, या फ्यूअलवर बेतलेला. 

आपल्या बापाची लाइन, धन्नोने  पाळण्यातच  ताडली असणार. कारण पाळण्यात असल्यापासूनच तो काही करत नाही. त्याची ही लाइन बघूनच त्याच्या आत्याने त्याच्या कानात, धन्नो sss अशी फुंकर घातली असणार. असा समाजवाद्याच्या  घरात धन्नो पैदा झाला. शाळेत घातल्यापासून  धन्नोने शेवटच्या बाकावर बसण्याखेरीज काहीच केले नाही. शाळेच्या प्रोटोकॉल प्रमाणे वरचे वर्गात गेला / घातला/ ढकलला शेऱ्यांनी  त्याचे प्रगतीपुस्तक लालमलाल दिसत असे. थोडक्यात, शाळेत अभ्यासातला अ सुद्धा न काढता धन्नो मॅट्रिक झाला. संपूर्ण पस्तीस टक्के! हा सृष्टीतला एक चमत्कार होता. धन्नोलासुद्धा अजून तो समजलेला नाही. मात्र त्या वर्षी, धन्नोच्या पाठी बसणारा मुलगा सर्व विषयांत फेल् झाला म्हणतात. होणारच! त्याने धन्नोची कॉपी केली असणार! 

मॅट्रिक झाला आणि प्रथे-परंपरेने  तो कॉमर -आठ- नायतर  सायनला गेला. वर्ग कोणताही असो, धन्नोला त्याच्याशी काही देणे-घेणे नव्हते. हा, इथे त्याची प्रगती होऊन तो मळणी करू लागला. बोलताना तोंडात गोटी ठेवून बोलायचं- त्याची लाळ  गळायची, असा भलताच आजार त्याला झाला. मात्र गाडी बारावीला अटकल्याने कॉलेज सुटले- तमाखू नाही. आता धन्नो बारा महिने, तेरा काळ कॉलनीत नाका, कट्टा, मंदिर, चौरसियाचा ठेला- इथे पडून असायचा. कुणाशी काही बोलायचाच नाही, काही विचारलं तर खुणा करत उत्तरे द्यायचा. 

धन्नोच्या बापाला आता टेंशन आले. समाजवाद असला म्हणून काय झाले? त्यात एकाने काहीच काम करायचे नाही, असे कुणी लिहून ठेवलेले नव्हते. धन्नोने काही उद्योग धंद्याचे करावे म्हणून त्याने नाना प्रयास केले. एकदा तो जोशी काकांच्या वाणसामान दुकानात पुड्या पण बांधायचा. मग एक दिवस त्याने जोशी काकांचीच पुडी बांधली, आणि ते सुटले! मग मंडप- डेकोरेटर्सचे काम करणाऱ्यांवर देखरेख करायला याला ठेवला, पण याच्यावर देखरेख करणार कोण? म्हणून ते ही सुटले.धन्नोच्या आयुष्यात उद्योग-धंदा असा सणासुदीला येऊन जायचा. बाकी बारा महिने बेकार.आपल्या या स्वयंभू पोराचे  करायचे काय? हे समाजवादी बापाला कळेना.. 

१६. गोष्टी सांगणारा माणूस...

 
यह बाप हराम की कमाई नही लेता

एक मनसुखरायजी ने बडी मेहनत से अपना छोटासा कारोबार बनाया। खुद पढ़ सका इसलिये अपने बच्चे को, धनदीप को पढ़ा लिखाना उपना फर्ज समझा जब विदेश जाकर पढनेका वक़्त आया तब उन्होने अपना कारोबार बेचकर उसकी पढाई का खर्चा उठाया बच्चेको समाज में प्रतिष्ठा मिले यह देखना चाहते थे। आज धनदीप पढ़-लिख कर एक बड़ी कार्गो कंपनी का मालिक बन गया हैमगर यह कंपनी विदेश से एक्साइज, कस्टम ड्युटी चुकानी पड़े इसलिये नकली कचरा , स्क्रैप के रूप में  विदेश से माल ला रहा है। एक तरह की स्मगलिंग ही है यह। मगर धनदीप मानने को तैयार नही। उसका कहना है, आजकल सभी कारोबार ऐसे ही चलते है। पैसा आनेपर धनदीप प्रतिष्ठीत भी बन चुका है। उसे अपनी करतुत पर गर्व है। मनसुख भाई को जब अपने बच्चे की करतुत का पता चला है, उन्होने उसके पैसेसे मिले सुख, समाधान को स्वीकारने से मना किया है। वह एक विरक्त साधू की तरह ही उस घर में सिर्फ दो वक़्त आते है, सोने और खाने। अपना सारा समय उन्होने गरीबों की सेवा करनेवाले एक आश्रम के लिये दिया है। धनदीप और उनमें जराभी नही बनती। आज उअनके सामने एक बड़ा प्रश्न है, उनकी हार्ट का बायपास करना है जिस्के लिये तीन लाख रूपये चाहीए। मगर धनदीप की कमाई हराम की कमाई है। वह लेना नही चाहते।  आज डाक्टर की रीपोर्ट आनेपर धनदीप उन्हे अस्पताल में भर्ती होने की जिद कर र्हा है, मगर वह इस्के लिये तैयार नही है। उनका कहना है, की इस देश में लाखो लोग पैसे होने के कारण बगैर इलाज के ही मर जाते है, इसमें एक मैं बन जाऊँ तो भी क्या? दोनो का झगडा, धनदीप कहता है, गर मेरे पैसे से इअलाझ नही करवाना है, तो यह घर छोड दो! वर्ना लोग मुझपर थूकेंगे, बाप का इलाज करनेवाला जाहिल कहेंगे। झगडे में मनसुखभाई के सीने में दर्द शुरू होता है। मगर वह दीखाते नही। अपने आप को सम्हालते है, एक झोली उठाकर हमेशा के लिये आश्रम जाने के लिये निकलते है। जाते जाते वह धनदीप को जो सुनाते है वह अपने आप में एक मिसाल है।